जळगाव प्रतिनिधी
जळगाव येथील इकरा शिक्षण संसथे चे अध्यक्ष आणि अल-फैज फाऊंडेशन जळगाव चे संस्थापक डॉ.अब्दुल करीम सालार यांना नुकतेच एका समारंभात “सिपास नामा” आणि “फखर ए खांदेश” पुरस्कार” प्रदान करण्यात आला. इकरा चे अध्यक्ष आणि अल-फैज फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. अब्दुल करीम सालार यांना मदिना कॉलनी, उस्मानिया पार्क, जळगाव येथील रहिवाशांनी एका कार्यक्रमात मानार्थ “सीपास नामा ” प्रदान केले. आभार पत्र सुप्रसिद्ध कवी आणि सूत्रसंचालक साबीर मुस्तफा आबादी यांच्या तर्फे हस्त लिखित मान पत्र, त्यांच्या शैक्षणिक सेवेचा गौरव म्हणून “फखर ए खानदेश ” पुरस्कार प्रदान करण्यात आला.शेख मसूद चाँद, फेरोज खान, अनसार खान, रझा सर, दानिश खान, जुनैद निशात यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
काझी कलीमुद्दीन, इक्बाल तडवी सर, अब्दुल रहीम सालार, फारुख खाटीक, मुझम्मील शेख, नईम शेख, डॉ. गयासुद्दीन सर, परवेझ खान, एजाज सर, नदीम मिर्झा, इम्रान सालार, वकार शेख, रहीम शेख आणि इतर यांनी आभार पत्र सादर केले. मदिना कॉलनी येथे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबीर मुस्तफा आबादी यांनी केल.या वेळी जळगाव येथील मान्यवर उपस्थित होते.