जळगाव :प्रतिनिधी
मार्च २०२१ अखेरीस जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात १० कोटींच्या नाविन्यपूर्ण कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून शहरी विभागासाठी ८ अग्निशमन गाड्या खरेदीसाठी २ कोटी ३१ लाखाच्या निधीस मंजूर केल्याने जिल्ह्यातील अनेक नाविन्यपूर्ण १२ कोटीचे नाविन्यपूर्ण मधून कामे होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
८ अग्निशमन गाड्यांची होणार खरेदी
जिल्ह्यात मनपा व नगरपालिका अंतर्गत सर्व आरोग्य संस्थेत अग्निशमन सेवा बळकटीकरण करण्यासाठी खासदार,आमदार व इतर लोकप्रतिनिधींच्या मागणी नुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना धरणगाव, पाचोरा,भडगाव, चोपडा, पारोळा,अमळनेर, जामनेर, शेंदुर्णी या ८ शहरात प्रत्येकी सुमारे ३० लक्ष प्रमाणे २ कोटी ३१ लाखाचा निधी लहान अग्निशमन गाड्या खरेदी साठी मंजूर केला असून लवकरच ८ गाड्यांची खरेदी होणार आहे.
असे आहेत नाविन्यपूर्ण कामं
बहुउद्देशीय डिजिटल दवंडी सायरन यंत्रणा, अभ्यासिका बांधकाम, महिला बचत गटासाठी सभागृह ,जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे फायर ऑडीट, स्मशानभूमी तसेच चौका चौकात सिमेंट बाक , रस्त्यालगत व नदी – नाल्यावर संरक्षक भिंतिचे काम, शव पेट्या, गावहाळ ,ओपन जिम व लोखंडी बाक व सार्वजनिक शौचालय बांधकामांचा समावेश आहे. जिल्हा विकासाच्या इतर योजनेतून जी कामे घेता येत नाही अशी कामे नाविन्यपूर्ण योजनेतून घेता येतात.
तालुका निहाय मंजूर कामं
रावेर – २४ काम – ५९ लक्ष, यावल – २४ काम – ४५ लक्ष , पाचोरा – १० काम – ५८ लक्ष , जामनेर – २६ काम ५९ लक्ष , जळगाव शहर व परिसर – ५० लक्ष, एरंडोल – १९ कामं – ४८ लक्ष , जळगाव – २० काम – २०७ लक्ष, पारोळा – १ काम – १५ लक्ष , मुक्ताईनगर – १३ काम – ७० लक्ष , बोदवड – ०२ काम – ०५ लक्ष, चोपडा – १२ काम – ५० लक्ष , धरणगाव – ०७ काम – १३४ लक्ष , भुसावळ – ८ काम ९० लक्ष , भडगाव – ८ ,काम – ५३ लक्ष , चाळीसगाव – २६ काम – ४८ लक्ष, अमळनेर – १० काम – ४० लक्ष