जामनेर शहरासह तालुक्यात महाविकास आघाडीतर्फे कडकडीत बंद

0
1

जामनेर, प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील लखिंपुर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटना विरोधात आज महाराष्ट्रातील महा विकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्यानुसार आज शहरासह जामनेर तालुक्यात पहुर शेंदुर्णी पाळधी नेरी वाकडी फत्तेपुर वाकोद आदी गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपले दुकाने व प्रतिष्ठाने सर्व दुकानदार यांनी बंद ठेवले होते सर पूर्ण जामनेर तालुक्यात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला सर पूर्ण पाठिंबा व प्रतिसाद मिळाला.

शहरातील नगरपालिका चौकात महा विकास आघाडीतर्फे काहीवेळा रस्ता रोको आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला याप्रसंगी महा विकास आघाडीतर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी नियोजन मंडळ सदस्य संजय गरुड युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील माजी जिल्हा सदस्य डी के पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे शंकर राजपूत प्रल्हाद बोरसे विलास राजपूत शिवसेना शहर प्रमुख अतुल सोनवणे सुधाकर सराफ एडवोकेट भरत पवार राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील युवा सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल लामखेडे उस्मान भाई अशोक जाधव नरेंद्र जंजाळ अरविंद चितोडिया पदाधिकारी उपस्थित होते

पहूर येथे कडकडीत बंद
महा विकास आघाडीचे माजी कृषी सभापती जिल्हा परिषद जळगाव प्रदीप लोढा भास्कर पाटील शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे उपसरपंच श्याम सावळे शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे सुकलाल बारी अशोक जाधव शैलेश पाटील किरण पाटील आमीन शेख आरिफ शेख सादिक पठाण शरद पांढरे ईश्वर बारी अशिष माळी राजू पाटील पुंडलिक सोनवणे आदी महा विकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेरी येथे कडकडीत बंद विकास आघाडीचे पदाधिकारी विनोद सोनवणे अरुण पाटील शिवाजी पवार नाना निलेश खोडपेविलास खोपडे रुपेश पाटील राजू पाटील श्याम बोरसे आदिमा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आव्हान केले होते. शेंदुर्णी येथे कडकडीत बंद पुकारण्यात आला यावेळी नियोजन मंडळ सदस्य संजय गरुड शिवसेना उपतालुका प्रमुख डॉक्टर सुनील अग्रवाल रवींद्र गुजर अजय भोई बारकू जाधव विलास बारी अशोक बारी शहरप्रमुख भैय्या गुजर विलास पाटील अजय भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here