जळगाव, प्रतिनिधी । लोकशाही मराठी पत्रकार संघ जळगाव तालुका संपर्क प्रमुखपदी अशोक पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हामध्ये सुध्दा लोकशाही मराठी पत्रकार संघ मजबूत होत असुन काही नियुक्त्या पत्रकार दिनानिमित्त करण्यात आल्या. लोकशाही मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बोंबले राज्य उपाध्यक्ष अमोल जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष व लोकशाही मराठी पत्रकार संघाचे महासचिव जिशान आफताब यांच्या आदेशानुसार काही पत्रकारांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी जळगांव तालुकातील शिरसोली येथील आवाज टिव्ही न्युज चॅनल प्रतिनिधी अशोक पाटील यांची नियुक्ती जळगांव तालुका संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली