चोपडा नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभाचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

0
11

चोपडा ः प्रतिनिधी

येथील नगरपरिषदेच्या नूतन पाणीपुरवठा योजनेंतर्गत रु. 64.76 कोटीच्या जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभाचे उद्घाटनआज 11 वाजता उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील हे होते. याप्रसंगी विशेष उपस्थितीमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,डॉ.सतिष पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांचा सहभाग होता.   यावेळी अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदिप पाटील, , माजी आमदार कैलास पाटील, माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, मनिष जैन, जेडीसीसी बँक संचालक घनश्‍्याम अग्रवाल, चोसाका माजी चेअरमन घनश्‍्याम पाटील, चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोरखतात्या पाटील, कृ.उ.बा. संचालक सुनिल जैन, जेडीसीसीच्या माजी उपाध्यक्षा इंदिराताई पाटील, विजयाताई पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अंभियंता शिवशंकर छगन निकम,माजी उपनगराध्यक्ष असगरअली सैय्यद आदिंची प्रमुख अतिथी म्हणून यांच्यासहर नगराध्यक्षा मनिषाताई चौधरी, उपनगराध्यक्ष भुपेंद्रभाई गुजराथी, गटनेते जीवनभाऊ चौधरी, तहसीलदार अनिल गावीत, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे आदिंची उपस्थिती होती.
या उद्‌ घाटन समारंभानंतर यावल रोडवरील पदम मोहन मंगल कार्यालयात कार्यक्रम झाला तसेच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजीत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here