ग्रामपंचायतीच्या दप्तरी हेराफेरी करत ,खोटे दस्त तयार केल्या प्रकरणी

0
10

मुक्ताईनगर :प्रतिनिधी  
तालुक्यातील मौजे कोर्हाळा ग्रामपंचायतीच्या दप्तरी हेराफेरी करून व खोटे दस्त तयार करून तक्रारदाराची व शासनाची  फसवणूक केली, म्हणून मुक्ताईनगर पंचायत समिती चे विद्यमान  गट विकास अधिकारी संतोष रघुनाथ नागतीलक आणि अन्य सहा जणांविरुद्ध मुक्ताईनगर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे  न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर पंचायत समितीचे कार्यक्षेत्रात असलेल्या मौजे कोर्हाळा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत सदस्या  दुर्गा धनराज कांडेलकर या गैरहजर असतानासुद्धा त्यांचे नावे ग्रामपंचायतीत खोटा ठराव घेऊन बनावट माहिती ठरावात लिहिण्यासाठी सदर ठरावा पासून दस्तुरखुद्द सूचकासह अन्य ग्रामपंचायत सदस्यही पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समजते, सदर ठरावाच्या अनुषंगाने व दप्तरी दाखवलेल्या खर्चानुसार 1)टीसीएल पावडर खरेदी,2)क्लोरीन डोस मशीन बसवणे आणि 3)जिल्हा परिषदेच्या शाळेस संरक्षक भिंत बांधणे अशा कामांत भरती वरती 1 लाख  74 हजार 963 रुपये, 38 हजार 500 रुपये  आणि 2 लाख रुपये असे मिळून 4 लाख 13 हजार 406  रुपयांचा सरकारी मालमत्तेचा स्वतः व सामुहिक लाभा साठी अपहार केला म्हणून मुक्ताईनगर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे  न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सदर अर्जा मध्ये 1) संतोष रघुनाथ नागटिळक 2) योगेश शिवाजी पवार 3) एस एस सुरवाडे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग मुक्ताईनगर 4)दिगंबर रामप्रसाद लोखंडे जिल्हा परिषद जळगाव  5)प्रवीण प्रल्हाद कांडेलकर कोर्हाळा  तालुका मुक्ताईनगर आणि बी.सी./बळीराम चांगो महाजन रा. कुर्‌हा-काकोडा तालुका मुक्ताईनगर अशा सहा जणांच्या विरुद्ध मुक्ताईनगर न्यायालयामध्ये फौजदारी अर्ज क्रमांक 40/2022 नुसार फिर्यादी संतोष त्रंबक कोळी यांचे तक्रारीनुसार अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदर तक्रारीच्या कारवाईची  मागणी साठी फिर्यादी हा जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर  उपोषणाला बसला असतांना संशयीत आरोपींनी चुकीचे दस्त व अहवाल देवून तक्रारदाराची प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयाच्या साक्षी ने फसवणूक करण्यात आली आहे असेही तक्रारदाराने  फिर्यादीत म्हटले आहे.  फिर्यादीतर्फे ॲड, संतोष इंगळे हे काम पहात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here