यावल (सुरेश पाटील)
तालुक्यातील कोरपावली येथे दलित वस्ती साठी सार्वजनिक महिलांचे शौचालय मंजुर झालेली रक्कम सहा लाख रुपये मंजुर झालेले असून सदरचे बांधकाम हे दलीत वस्तीत न करता दहिगाव रस्त्यावर असलेल्या वाहत्या नाल्यामध्ये सदरचे अनधिकृत बांधकाम फक्त आणि फक्त सरकारी निधि लाटण्यासाठी ईस्टीमेट प्रमाणे बांधकाम न करता निकृष्ट दर्जाचे काम कलेले दिसून येत असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे
अशा प्रकारे संबंधीत पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम शाखा अभियंता,गट विकास अधिकारी अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामाची चौकशी करावी अशी दलित बांधव व गावकऱ्यांनी केली आहे.