जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सोमवारी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. याशिवाय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचीही भेट घेतली. या वेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांचीही भेट घेतली. या वेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील उपस्थित होते. विद्यापीठाशी निगडित अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. विद्यार्थीहिताच्या प्रश्नांवर कुलगुरू डॉ.माहेश्वरी यांनी राज्यपालांना साकडे घातले.