जळगाव ः प्रतिनिधी
स्वातंत्र्यानंर देशाचा विकास आणि देशातील गोरगरीब, कामगार, शेतमजूर,दलित व अल्पसंख्याकांच्या विकासाच्या योजना काँंग्रेस पक्षानेच सुरू केल्या असून या योजनांमुळे या वंचीत वर्गाला न्याय देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले असून आजही करीत आहे. म्हणूनच काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या हिताचा असल्याचे विचार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस व जळगाव शहर जिल्हा कमेटीचे डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचे,निरीक्षक किशोर बोरकर यांनी येथे व्यक्त केले.
जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमेटीव्दारा काँग्रेस भवनात आयोजित डिजिटल सदस्य नोंदणी अभियानासाठी ते आले होते.याप्रसंगी ते पुढे म्हणाले की,काँग्रेस पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचे मुल्यमापन करून त्या कार्यकर्त्यांस न्याय देण्याचे काम खासदार राहुल गांधी करणार आहेत.पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी येत्या 31 मार्चपर्यंत आपआपली सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन पक्ष निरीक्षक किशोर बोरकर यांनी केले आहे,
या प्रसंगी अमरावती शहर कांग्रेसचे सरचिटणीस दिनेश खोडके, माजी अध्यक्ष उत्तमराव सपकाळे, जाकिर बागवान, सुधीर पाटील, सखाराम मोरे, दीपक सोनवणे,अमिना तडवी,शोभा मोरे, ललिता अहिरे,मोहसीन पिंजारी,शफी बागवान,राजू सोनवणे, गोकुल चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्र संंचालन सरचिटणीस प्रदीप सोनवणे यांनी केले.
सुजाता तायडे – सुधा काबरा यांचा सत्कार
याप्रसंगी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमेटीत सर्वात जास्त 775 एवढी सदस्य नोंदणी केल्याबद्दल सौ.सुजाता शाम तायडे व श्रीमती.सुधा काबरा यांनी 110 नोंदणी केल्याबद्दल त्यांचा किशोर बोरकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष शामकांत तायडे, जिल्हा कांग्रेस कमिटी चे माजी अध्यक्ष उदय पाटील, ग्रामीण अध्यक्ष मनोज चौधरी,अमजद पठाण ,भाऊसाहेब सोनवणे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.