कजगाव ता. भडगाव, प्रतिनिधी । येथील कनाशी रस्त्यावरील शेतातून गेलेल्या विजेच्या तारेमुळे अचानक आग लागल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली.
कजगाव येथील शेतकरी शैलेंद्र तकतसिंग पाटील यांचे कनाशी रस्त्यावर शेत असून त्यांच्या शेतालाच लागून पाच नंबर ट्रान्सफर्मर आहे तेथून गेलेल्या विजेच्या तारेमुळे शॉर्टसर्किट झाले व त्यामुळे तेथील ठिकाणी अचानक आग लागली त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली शेताला लागूनच ट्रान्सफर्मर असल्याने तेथील एका शेतात तब्बल पाच हजार केळी चे खोड लागवळ केले आहे मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांनि तीव्र चिंता व्यक्त केली आहे जर वेळीच शेतकरी घटनास्थळी पोहचले नसते तर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते मात्र वेळीच काही शेतकऱ्यांनी समय सुचकता दाखवून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.
महिन्याभरातील दुसरी घटना
दरम्यान यापूर्वीही गावातील स्टेशन रस्त्यावरील ट्रांसफार्मर जळाले होते भर लोकवस्तीतील ट्रान्सफर्मर जळल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती मात्र आता शेतातुन गेलेल्या विजेच्या तारेमुळे लागलेल्या आगीमुळे शेतकरी भयभईत झाले आहेत त्यामुळे महावितरणच्या उदासीन कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे वारंवार घडणाऱ्या घटनेनेकडे विजविरण कंपनीने लक्ष घालावे अशी मागणी जोरदार होत आहे