जळगाव ः प्रतिनिधी
इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट तर्फे आव्हाने फाटया जवळ कानळदा रस्त्या लगत कट्टा मागील दोन महिन्यापासून तयार करण्यात येत होता तसेच तिथे बसण्यास ५ मोठ्या बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली, त्या कट्ट्याचे लोकार्पण डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी यांचे हस्ते करण्यात आले.
हा कट्टा गावातील वयोवृद्ध मंडळी गावाबाहेर सकाळ व संध्याकाळी सैर सपाटा मांरणारी मंडली तसेच बाहेरगावी जाणारे येणारे प्रवासी त्याच्यासाठी खूप सोयीस्कर आहे. त्याच प्रमाणे दत्तक घेतलेला बोरखेडा गावात देखील इनरव्हील कट्टा तयार करून दोन मोठे बाकड्यांचे व्यवस्था करून इनरव्हील चौक तयार करून गावकर्यांसाठी कट्टा तयार करून आज रोजी इनरव्हील कट्ट्याच्या लोकार्पण करण्यात आला. सदर कार्यक्रमाला इनरव्हील क्लब आफ जळगाव ईस्टरच्या अध्यक्ष प्रीती दोषी डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी , सचिव निता परमार ,पास्ट प्रेसिडेंट सीमा जाकिटे , आदिसह आव्हाणे येथील आव्हाने फर्स्ट ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.