आमदार शिरिषदादा चौधरी यांनी हिवाळी अधिवेशनात अति महत्वाचे एकूण २४ प्रश्न केले उपस्थित

0
14

यावल, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपन्न झाले या हिवाळी अधिवेशनात रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी महत्वाचे एकूण २४ लक्षवेधी प्रश्न विचारले आहेत.
प्रश्न क्रमांक ३७ हजार १७८ बघितला असता यावल येथील नगरपालिकेच्या अतिरिक्त साठवण तलावाच्या बांधकामात पावणेदोन कोटी रुपयाच्या फवारा बाबतचा प्रश्न नगर विकास विभागाचे नगर विकास मंत्री यांना विचारण्यात आला आहे.
यावल येथील नगरपालिका द्वारे यावल शहरास पाणीपुरवठा करणारा अतिरिक्त साठवण तलावाच्या बांधकामात कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी संगनमत करून या कामात पावणे दोन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप खुद्द नगराध्यक्षा व काही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दि. २८/०९/२०२१ रोजी केला असल्याचे उघडकीस आले हे खरे आहे का? असा प्रश्न उपस्थित करून सदर कंत्राटदार व अधिकारी यांची चौकशी करण्यात आली आहे का?असल्यास त्यात दोषी वर काय कारवाई करण्यात आली नसल्यास विलंब होण्याची कारणे काय?अशा प्रश्न रावेर विधानसभा आमदार शिरीषदादा चौधरी यांनी विचारल्याने तसेच यावल नगरपालिकेच्या अतिरीक्त साठवण तलावाचा कार्यारंभ आदेश बघितला असता साठवण तलावाचे बांधकाम २ कोटी ८४ लाख ३८ हजार ५१६ रुपयाचे असताना या कामात पावणेदोन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार म्हणजे एकूण रकमेच्या ७५ टक्के रकमेचा भ्रष्टाचार ठेकेदाराने आणि संबंधितांनी टक्केवारीच्या माध्यमातून केल्याने यावल शहरात मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यासोबत जळगाव जिल्ह्यातील ८० गावे सामुदायिक पाणी पुरवठा योजनेचे २४ कोटी रुपये पाण्यात गेल्याचा प्रश्न तसेच रावेर ग्रामीण रुग्णालय चे रूपांतर उपजिल्हा रुग्णालय होणेबाबत, यावल येथील क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरु होणेबाबत,रावेर सावदा,फैजपूर येथील पोलिस वसाहतीतील निवासस्थानाचे बांधकाम करणे बाबत,पाल रावेर या रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेत बाबत,यावल अभयारण्यातील पाल,गाड्या व जामन्या वन क्षेत्रातील एकूण १०८ वन मजुरांचे वेतन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून रखडले असल्याबाबत,जळगाव येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करून खरे लाभार्थी उपाशी आहेत आणि दलाल,अधिकारी तुपाशी, रावेर तालुक्यातील विवरा बलवाडी या जिल्हा मार्गाचे चार महिन्यातच तीन तेरा वाजले आणि सात कोटी रुपये पाण्यात गेल्याचा प्रश्न सुद्धा आमदार शिरिषदादा चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्र्यांकडे उपस्थित केला आहे,
यासोबत महाराष्ट्र राज्याचा अति महत्त्वाचा प्रश्न म्हणजे क्लायमेट कंट्रोल नावाच्या साइटवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार भारतातील मुंबई धोक्यात दाखविण्यात आली आहे जर कार्बन उत्सर्जन असेच चालू राहिले तर मुंबईसह आशियातील पन्नास शहरे समुद्राच्या पाण्यात बुडतील असे सांगण्यात आले आहे साधारणपणे जमिनीचा दहावा भाग समुद्राच्या पाण्यात बुडेल असे तज्ञांच्या दि.१५/१०/२०२१ रोजी अहवाल आला आहे हे खरे आहे का?आणि खरे असल्यास वारंवार होणारे वातावरणातील बदल आणि नैसर्गिक आपत्तीचा वाढलेला टक्का पाहता संबंधित अहवालाचा अभ्यास करून त्यानुसार तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर काही विचार सुरू झाला असल्यास त्याची कृपया माहिती द्यावी नसल्यास अद्यापि कारवाईस विलंब होण्याची कारणे काय? याचा खुलासा करावा.
यासह इतर अनेक महत्वाचे प्रश्न रावेर विधानसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय आमदार शिरिषदादा चौधरी यांनी सन २०२१ चे हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेले आहेत,उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागाचे मंत्री काय ठोस निर्णय घेणार आहेत याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here