अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे (AICTE) ने महाविद्यालयांना आठ भाषांमध्ये अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग)चे शिक्षण देण्याची परवानगी दिली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून मराठीसह हिंदी, बंगाली, तेलुगू, तमीळ, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या आठ स्थानिक भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेता येणार आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण तसंच आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल. आत्तापर्यंत इंग्रजीच्या भीतीने अनेक हुशार विद्यार्थी अभियांत्रिकीपासून दूर राहिले आहे. जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, चीन व अन्य देशांमध्ये अभियांत्रिकेचे शिक्षण त्यांच्या स्थानिक शिक्षण दिले जाते, हे उल्लेखनीय.
अभातंपचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये तांत्रिक शिक्षण घेता आले तर त्यांचा पाया मजबूत व्हायला मदत होईल. आम्हाला पूर्ण देशामधून एकूण ५०० अर्ज आले आहेत. भविष्यात आम्ही अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण आणखी ११ भाषांमधून देण्याबाबत नियोजन करत आहोत.
या सर्व अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तक, नोट्स सर्व संबंधित भाषांमध्ये उपलब्ध आहे. सोबत ‘स्वयम’ आणि MOOC या पोर्टल्सवरचे साहित्यही या भाषांमध्ये भाषांतरित केले आहे, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.