यावल ः तालुका प्रतिनिधी
येथील तहसीलदार महेश पवार कोरोना पॉझिटिव असतानाही शासकीय कामकाज सुरू… असे वृत्त फक्त आणि फक्त दैनिक साईमतमध्ये दि.१८मार्च २०२र्१ रोजी प्रसिद्ध झाल्याने वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तहसीलदार महेश पवार यांची वैद्यकीय रजा मंजूर केली आहे.
महेश पवार यांच्या वैद्यकीय रजेच्या कालावधीत त्यांच्याकडेच असलेला तहसीलदार यावल या पदाचा अतिरिक्त कार्यभार यावल तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांनी काढून आदेशाच्या प्रती उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर, तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार पाटील यांच्यासह संबंधित अधिकार्यांकडे पाठविला आहे.